आदिवासी युवकांना रोजगारासाठी मिळणार अर्थसहाय्य

- Advertisement -

उस्मानाबाद । १४ जुलै : आदिवासी युवक व युवतींसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या मूळ उद्देशाने राष्ट्रीयकृत बँक मार्जीन मनी योजनअंतर्गत विविध व्यवसायासाठी जुन्नर येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ  शाखा कार्यालयास सन 2020-21 साठी लक्षांक प्राप्त झाला आहे. लक्षांक तक्ता जिल्हानिहाय व योजनानिहाय खालीलप्रमाणे आहे.

एक लाख रुपयाच्या आतील प्रकल्प खर्च असलेल्या  कोणत्याही  व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पिठ गिरणी-02, पेपर डिश बनवणे, ज्युस सेंटर-02, तंबु सजावट, लाऊड स्पीकर केंद्र-03, थ्रेशर युनिट संख्या-02, ऑटो वर्कशॉप-05, किराणा दुकान-05, कापड दुकान-02, इलेक्ट्रिक दुकान-02, खाद्य उद्योग (पापड मसाला शेवया-03, कटलरी दुकान-03 अशा एकूण-29 व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कापड दुकान, साडी दुकान-05, DTP संगणक, झेरॉक्स -02, हॉटेल ढाबा-05, जनरल स्टोअर, स्टेशनरी -05, खते बियाणे दुकान-02, ट्रॅक्टर ट्रॉली-02, दुग्ध व्यवसाय युनिट संख्या-10, मालवाहू मिनी ट्रक-02, प्रवासी वाहन-02, मालवाहु रिक्षा-02, औषधी दुकान-02 अशा एकूण 39 व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असे जुन्नर, पुणे येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालयाच्या शाखा व्यवस्थापकांनी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisement -