इंग्लंड युरो कप २०२०च्या फायनलमध्ये; डेन्मार्कचा २-१ने पराभव केला, १९६६ नंतर प्रथमच…

इंग्लंड युरो कप २०२०च्या फायनलमध्ये; डेन्मार्कचा २-१ने पराभव केला, १९६६ नंतर प्रथमच…
- Advertisement -

लंडन: इंग्लंड युरो कप २०२०च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. १९६६ च्या वर्ल्डकपनंतर इंग्लंडने प्रथमच एखाद्या स्पर्धेतील सेमीफायनलची लढत जिंकली आहे. कर्णधार हेरी केनच्या गोलमुळे इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे त्याच्या आधी केनने मारलेली पेनल्टी वाचवण्यात आली होती.

वाचा- ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ‘त्या’ हॉट फोटोवर पाकिस्तानी महिलेनं केली कमेंट; अन् मग…

बुधवारी रात्री झालेल्या लढतीत इंग्लंडने डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला. आता रविवारी अंतिम फेरीत जेतेपदासाठी इंग्लंडची लढत इटलीविरुद्ध होणार आहे. इटलीने सेमीफायनलमध्ये स्पेनचा पेनल्टी शूटआउटमध्ये ४-२ असा पराभव केला.

वाचा- भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंका क्रिकेटमध्ये राडा

प्रथमच युरोच्या फायनलमध्ये

इंग्लंड संघाने १९६६च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर प्रथमच एखाद्या सेमीफायनलमधील मॅच जिंकली आहे. इंग्लंडच्या हेरी केनने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलमुळे ते अंतिम फेरीत पोहोचले. युरो कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ आहे. सामन्यात पहिल्या हाफमध्ये ३०व्या मिनिटाला डेन्मार्कच्या मिक्केल डेम्सगार्डने २५ मीटर लांबून फ्री किक मारला आणि आघाडी मिळवून दिली. यामुळे इंग्लंडचे चाहते निराश झाले.

वाचा- शुभमन गिलला इंग्लंड सोडण्याचे आदेश; बदली खेळाडूबाबत ही आहे अपडेट

त्यानंतर ९ मिनिटांनी डेन्मार्कचा बचाव भेदत इंग्लंडने बरोबरी साधली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. ९० मिनिटात दोन्ही संघांनी १-१ गोल केल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला.

Source link

- Advertisement -