Home बातम्या ऐतिहासिक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची बैठक

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची बैठक

0
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची बैठक

मुंबई, दि.24 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 242 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्यासह महामंडळाचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गोवा राज्यात पशुखाद्य आणि भात शेती मध्ये फवारणी साहित्य तसेच शेत उपयोगी औजारे व निविष्ठा यांची आवश्यकता आहे.यामध्ये महामंडळाने पुरवठा केल्यास महामंडळाला सुध्दा गोवा राज्यात व्यवसायाची संधी मिळेल व महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल, याबाबत चर्चा करण्यात आली.महामंडळाच्या रिक्त पदाबाबत लोकसेवा आयोगामार्फत कार्यवाही करण्यात यावी.तसेच अनुकंपा तत्त्वावर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.महामंडळाच्या कामकाजाच्या अनुषंगाने इतर विषयांचीही चर्चा करण्यात आली.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ