उस्मानाबाद । २७ जुलै : कळंब तालुक्यातील मोहा येथे तीन वर्षांपूर्वी एकाचा खून झाला होता. या प्रकरणी आज सोमवारी २७ जुलै रोजी मोहा येथीलच एकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उस्मानाबाद सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालू होती.
कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात २०१७ साली या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. उस्मानाबाद येथील प्रथम सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत २८ वर्षीय आरोपी संजय दिलीप मडके यास कलम ३०२ नुसार जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खुनाचा पुरावा नष्ट केला म्हणून भारतीय दंड संहितेचे कलम २०१ नुसार तीन वर्षे सक्त मजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याच खटल्यातील दुसरा २५ वर्षीय आरोपी सुदर्शन बिभीषण मडके याला पंधरा हजार रुपयांच्या बंधपत्रावर चांगल्या वर्तणुकीची हमी घेत मुक्त केले आहे.
- Advertisement -