पीळदार शरीरयष्टी असलेल्या रोनाल्डोने आपल्या हातात एक कप पकडला आहे, आणि तो एका आरामखुर्चीवर अर्धनग्न अवस्थेत निवांत बसला असल्याचे या फोटोत दिसून येते. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी, महिला त्याच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तो सध्याचा जगातील आघाडीचा फुटबॉलपटू आहे. 36 वर्षीय रोनाल्डोचा फिटनेस अनेक तरुणांना लाजवेल असा आहे. या वयातही त्याचे सिक्स पॅक अॅब्ज दिसत आहेत. रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्स आणि चार मुलांसमवेतचे फोटो सोशल मीडियात अपलोड केले आहेत.
काही वेळातच त्याच्या फोटोला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांनी फक्त दुपट्ट्याने काम होणार नाही असं म्हटलं आहे, तर काहींनी 6 पॅक बिस्कीट चहामध्ये बुडवण्यास सांगितले आहे. खूप प्रतिक्रिया येऊ लागल्याने वैतागून त्या महिलेने मी विनोद केला होता, पण काही लोकांना राग आल्याचे तिने म्हटले आहे.
दरम्यान या लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यात 5 गोल केले होते, पण बेल्जियमने पराभवाचा धक्का दिल्याने पोर्तुगालला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. जगभरातील प्रमुख खेळाडूंमध्ये रोनाल्डोचा समावेश होतो. ज्युवेंट्स फुटबॉल क्लबचा स्टार खेळाडू असलेल्या रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर 30 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. हा मॅजिक आकडा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.