इंग्लंडकडून पेनल्टी शूटआउट मीस करणाऱ्या तीन खेळाडूंवर वर्षद्विषी टीका करण्यात आली आहे. काही युझर्सनी संबंधित तीन खेळाडूंवर सोशल मीडियावरून वर्षद्वेषी टीका केली आहे. या घटनेनंतर इंग्लंडच्या फुटबॉल संघाने खेळाडूंसाठी वापरण्यात आलेली भाषा चुकीची आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
वाचा- Video : लंडनच्या रस्त्यावर राडा; इंग्लिश चाहत्यांनी इटालियन चाहत्यांची…
या घटनेवर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडचा हा संघ सोशल मीडियावर वर्णद्वेषी टीकेसाठी नव्हे तर कौतुकास पात्र आहे. अशा प्रकारची टीका करणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे.
वाचा- युरो कप जिंकला इटलीने आणि कप घेऊन गेला पोर्तुगालचा रोनाल्डो
इंग्लंडला अखेरचे तीन पेनल्टी गोल करण्यात अपयश आले. यात मार्कस रशफोर्ड, जादोन सांचे आणि १९ वर्षीय बुकायो साका यांचा समावेश होता. या तिनह खेळाडूंवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे आम्ही स्तब्ध झाल्याचे इंग्लंड फुटबॉल संघाने म्हटले आहे.
इंग्लंडच्या खेळाडूंनी युरो कपच्या सामन्यांच्या आधी गुढघ्यावर बसून वर्णद्वेष दूर करण्यासाठी आवाज उठवला होता. पेनल्टी शूटआउट मीस करेपर्यंत संघाने सर्वांची मने जिंकली होती. पण विजेतेपद हुकल्यानंतर मात्र काही चाहत्यांनी अशापद्धतीची भाषा वापरली.
वाचा- euro 2020 final : पेनेल्टी शूटआऊटमध्ये इटलीचा थरारक विजय
१९६६ नंतर एकही विजेतेपद नाही
पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव होण्याची इंग्लंडची ही तिसरी वेळ आहे. इंग्लंड प्रथमच युरो कपच्या फायनलमध्ये खेळत होता. त्यांनी ६६ साली मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा त्यांनी घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकला होता.