Home अश्रेणीबद्ध युरो कप जिंकला इटलीने आणि कप घेऊन गेला पोर्तुगालचा रोनाल्डो

युरो कप जिंकला इटलीने आणि कप घेऊन गेला पोर्तुगालचा रोनाल्डो

0
युरो कप जिंकला इटलीने आणि कप घेऊन गेला पोर्तुगालचा रोनाल्डो

लंडन : वेम्बली स्टेडियममध्ये रंगतदार ठरलेला अंतिम सामना पेनल्टी शूटआउटमध्ये जिंकत इटलीने जेतेपदावर नाव कोरले. आणि इंग्लंडचा स्वप्नभंग झाला. पाच दशकांहून अधिक काळ जेतेपदाची इंग्लंडची प्रतीक्षा यामुळे कायम राहिली. पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडला 3-2 ने पराभव करत इटलीने युरो स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. युरो कप जिंकण्याची इटलीची ही दुसरी वेळ ठरली.

वाचा- इंग्लंडच्या कर्णधाराची पत्नी ढसाढसा रडली, पाहा इटलीचा लंडन ते रोम जल्लोष

वाचा- Video : इंग्लिश चाहत्यांनी इटालियन चाहत्यांची धरपकड करत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारले

गेल्या 55 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. 1966 च्या वर्ल्डकप नंतर इंग्लंडने कोणत्याही स्पर्धेचं जेतेपद जिंकलेलं नाहीय. 1990, 1996, 1998, 2004, 2006 आणि 2012 च्या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये पेनल्टी शूटआउटमध्येच इंग्लंडने सामने गमावले आहेत.

वाचा- इटलीचा हिरो लियोनार्डो! युरो कपच्या फायनलमध्ये इतिहास घडवला

पुरस्कार विजेते खेळाडू –
दरम्यान, युरो कप 2020मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोला गोल्डन बूटने सन्मानित करण्यात आले. रोनाल्डोने या स्पर्धेत 4 सामने खेळले असून त्याने 5 गोल केले. तसेच एक गोल करण्यासाठी त्याने मदत केली होती. दुसरीकडे, झेक प्रजासत्ताकच्या पॅट्रिक स्किकनेही 5 सामन्यांत 5 गोल केले, पण त्याने एकही गोल करण्यात मदत केली नाही. त्यामुळे रोनाल्डोला हा पुरस्कार देण्यात आला. अंतिम-16मध्ये बेल्जियमकडून 1-0 ने पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगालला स्पर्धेतून बाहेर जावे लागले.

युरो 2020 सर्वाधिक गोल करणारे खेळाडू –
1)क्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) – 4 सामन्यात 5 गोल
2) पॅट्रिक स्किक (झेक प्रजासत्ताक) – 5 सामन्यांत 5 गोल
3)करीम बेंझेमा (फ्रान्स) – 4 सामन्यांत 4 गोल
4)एमिल फॉसबर्ग (स्वीडन) – 4 सामन्यांत 4 गोल
5)रोमेलु लुकाकू (बेल्जियम) – 5 सामन्यांत 4 गोल

वाचा- euro 2020 final : पेनेल्टी शूटआऊटमध्ये इटलीचा थरारक विजय, युरो चषक पटकावला

सर्वाधिक गोल –
1) इटली (7 सामन्यात 13 गोल) आणि स्पेन (6 सामन्यात 13 गोल)

सर्वात कमी गोल –
फिनलँड, तुर्की आणि स्कॉटलँडने तीन सामन्यात प्रत्येकी 1 गोल केला होता.

सर्वोत्तम बचाव :
इंग्लंडने 7 सामन्यात फक्त दोन गोल स्वीकारले

सर्वात वाईट बचाव :
युक्रेनने 5 सामन्यांत 10 गोल स्वीकारले.

वैयक्तिक पुरस्कार –
गोल्डन बूट – क्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) – 4 सामने 5 गोल
सिल्वर बूट – पॅट्रिक स्किक (झेक प्रजासत्ताक) – 5 गोल

ब्राँझ बूट – करीम बेंझेमा

गोल्डन बॉल (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) : जियान्लुइगी डोन्नारुम्मा
– युरोमधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड झालेला तो पहिला गोलकीपर ठरला.

युरो 2020 ची बक्षीस रक्कम
विजेता संघ – इटली – 103.5 कोटी रुपये
उपविजेता संघ – इंग्लंड – 72.4 कोटी रुपये

Source link