Home अश्रेणीबद्ध युरो कप फायनलमध्ये घडली धक्कादायक घटना; राडा करणाऱ्या प्रेक्षकांनी खेळाडूचे ४० लाखाचे घड्याळ चोरले

युरो कप फायनलमध्ये घडली धक्कादायक घटना; राडा करणाऱ्या प्रेक्षकांनी खेळाडूचे ४० लाखाचे घड्याळ चोरले

0
युरो कप फायनलमध्ये घडली धक्कादायक घटना; राडा करणाऱ्या प्रेक्षकांनी खेळाडूचे ४० लाखाचे घड्याळ चोरले

लंडन: युरो कपच्या फायनलमध्ये इटलीने इंग्लंडचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. सामना झाल्यानंतर दोन्ही देशातील प्रेक्षकांच्यात वादाच्या घटना देखील घडल्या.

वाचा- तुमच्या पेक्षा बांगलादेशचा संघ चांगला; इंग्लंडच्या दुय्यम संघाकडून क्लीन स्वीपनंतर चाहते भडकले

अंतिम सामन्यासाठी स्टेडियममध्ये २ हजार ५०० प्रेक्षक विना तिकीट घुसले होते. या विना तिकीट प्रवेश केलेल्या प्रेक्षकांनी तिकीट विकत घेतलेल्या लोकांच्या जागांवर ताबा घेतला होता. यामुळे अनेक व्हीआयपी चाहत्यांना त्याचा फटका बसला. यात एका फॉम्युला वन खेळाडूचा देखील समावेश होता.

वाचा- स्मृती म्हणाली, ‘भारताला वर्ल्ड कप जिंकायचाय तर…’

द सन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार २१ वर्षीय एफवन ड्रायव्हरला सामना झाल्यानंतर एका ग्रुपने घेरले. हा खेळाडू सामना झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला होता. एका व्यक्तीने त्याची कॉलर पकडली आणि दुसऱ्याने त्याची ४० लाखाची रिचर्ड माइलचे घड्याळ काढून घेतले.

वाचा- Video :पार्किन्सननं टाकला शेन वॉर्नसारखा स्पिन; पाकचा खेळाडू बघत राहिला

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने द सन बेबसाइटला सांगितले की एफवन ड्रायव्हर नॉरिसला एकाने पकडले होते आणि त्याचे घड्याळ देखील काढून घेतले. यामुळे नॉरिस हैराण झाला होता. तेथे सुरक्षा कर्मचारी नसल्याने हा प्रकार घडला.

वाचा- ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये यशस्वी व्हा आपण एकत्र आइसक्रीम खाऊ’

नॉरिसची टीम मेक्लारेनने या घटनेला दुजोरा दिला आहे. युरो कप २०२०च्या फायनल मॅचमध्ये ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याचे महागडे घड्याळ काढून घेण्यात आले. या घटनेत नॉरिसला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. या प्रकारावरून सामन्या दरम्यान परिस्थिती किती खराब होती याचा अंदाज येऊ शकतो.

वाचा- रॉजर फेडररने घेतला मोठा निर्णय; विम्बल्डनमधील पराभवानंतर आता…

इटली संघाचे मॅनेजर रॉबर्टो मॅनचिनीच्या मुलाच्या खुर्चीवर अन्य एका व्यक्तीने ताबा घेतला होता.

Source link