Home गुन्हा रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतली ,गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतली ,गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ):- रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील मौजे तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर दिनांक २६ जुलै रोजी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मानवतेला काळीमा फासणार्या या अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता. सदर घटनेचा सर्व समाजातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त होऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात या अमानवीय घटनेविषयी चीड निर्माण होऊन सर्व नागरिकांच्या भावना संतप्त झाल्या होत्या.

सदर घटनेची पालकमंत्री या नात्याने गंभीर दखल घेऊन कु.आदिती तटकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात व्यक्तिश: भेट घेतली आणि त्यांना या घटनेतील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने गृह विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, याकरिता पत्रान्वये विनंती केली आहे.