हायलाइट्स:
- मिलिंद आणि अंकितामध्ये आहे २६ वर्षांचं अंतर
- युझरने अंकिताला विचारला त्यांच्या वयाशी संबंधित प्रश्न
- सामान्य मानसिकतेतून बाहेर पडून मिलिंदशी लग्न केल्याचं अंकिताचं उत्तर
सुशांतची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली, प्रतीकने केला खुलासा
अंकिताने चाहत्यांसाठी आस्क मी एनिथिंग सेशनचं आयोजन केलं होतं. त्यात अनेकांनी अंकिताला वैयक्तिक प्रश्न विचारले. एका युझरने अंकिताला तिच्या आणि मिलिंदच्या वयातील अंतराबद्दल विचारत लिहिलं, ‘लग्नापूर्वी अनेक भारतीयांनी तुला मोठ्या वयाच्या मुलासोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला असेल मग तू त्या सर्व गोष्टी कशा सांभाळून घेतल्या?’ युझरच्या या प्रश्नावर उत्तर देत अंकिताने लिहिलं, ‘आपल्या समाजात जे करायला परवानगी नाही त्यावर बोलायला लोकांना जास्त आवडतं आणि हे फक्त भारतातच पाहायला मिळतं असं नाही. अनेकदा असं पाहिलं जातं की आपल्या मनाला जे पटत नाही आपण त्याबद्दल पटकन बोलतो. मी नेहमी अशीच जगते जसं माझं मन मला सांगतं. मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.’
यापूर्वीही युझर्सनी मिलिंद आणि अंकिताला त्यांच्या वयातील अंतराबद्दल प्रश्न विचारले होते. उत्तरात त्यांनी त्यांचे विचार मांडत म्हंटल, ‘आमच्यात २६ वर्षाचं अंतर आहे पण आम्हाला त्यामुळे कसलीच अडचण होत नाही. परंपरा या समाजातील व्यक्तींनी बनवल्या आहेत. आम्हाला वाटतं आपल्याला जे पटतं ते करावं. प्रत्येकाला हा हक्क असला पाहिजे की त्यांनी कोणावर प्रेम करायचंय. हे त्यांच्या मनावर आहे, समाजावर नाही. समाजाचा यात कोणताही हस्तक्षेप नसावा.’
ठरलं ! ‘ही’ अभिनेत्री करणार ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं सूत्रसंचालन