हायलाइट्स:
- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची लव्ह लाइफ नेहमीच राहिली चर्चेत
- अंकिता लोखंडे नंतरही बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुशांतचं नाव
- सुशांतनं एका कार्यक्रमात केला होता त्याच्या खऱ्या प्रेमाचा उल्लेख
सुशांतसिंह राजपूतनं आपल्या या प्रेमाचा खुलासा एका कार्यक्रमात केला होता. २०१९ मध्ये सुशांत एका कार्यक्रमात वक्ता म्हणून पोहोचला होता. त्यावेळी त्यांनं त्याच्या या प्रेमाविषयी सांगितलं होतं. सुशांत पहिल्यांदा चौथ्या इयत्तेत असताना प्रेमात पडला होता आणि ती व्यक्ती त्याची शिक्षिका होती. हे आपलं खरं प्रेम असल्याचं सुशांतचं म्हणणं होतं.
सुशांतनं मस्करीत सांगितलं होतं की, त्यानं आपल्या शिक्षिकेला कधीच अप्रोच केलं नाही कारण त्याला परीक्षेत पास व्हायचं होतं. त्यानंतर ५ वर्षांनी सुशांतला एका मुलीनं पहिल्यांदा प्रपोज केलं. त्यावेळी तो नवव्या इयत्तेत होता. यावेळी सुशांतनं सांगितलं होतं की, मी आयुष्यात कोणालाच ‘आय लव्ह यू’ असं बोललेलो नाही.
सुशांतनं या कार्यक्रमात आपल्या पहिल्या डेटचाही उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, ‘मी त्यावेळी इंजिनियरिंगच्या मुलांना शिकवत असे आणि त्या पैशांनी मी स्वतःसाठी एक बाइक घेतली होती. त्यानंतर मी माझ्या पहिल्या वहिल्या डेटवर पराठे खाण्यासाठी मुरथलला गेलो होतो.’
येत्या १४ जूनला सुशांतसिंह राजपूतची पहिली पुण्यतिथी आहे. मागच्या वर्षी वांद्रे येथील आपल्या घरात सुशांतनं गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याच्या अशाप्रकारच्या अचानक एक्झिटनं सर्वांनाच धक्का बसला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.