Home बातम्या राष्ट्रीय अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्यानं हल्ला केला अन्…

अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्यानं हल्ला केला अन्…

0
अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्यानं हल्ला केला अन्…

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका दीड वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून संबंधित बालकाला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संबंधित बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. यामुळे या बालकाचा जीव वाचला. दरम्यान या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उस्मानिया पार्क परिसरात राहणारा शाहरुख खान हा दीड वर्षाचा बालक सकाळी दहा वाजता अंगणात खेळत होता. अचानक ऐका पिसाळलेल्या कुत्र्याने ज्या बालकावर हल्ला केला. या बालकाचा मानेवर कुत्र्याने चावा घेत लचका तोडल्याने बालक गंभीर जखमी झाला. यावेळी कुत्र्याने ज्या बालकाला ओढण्याचा प्रयत्न देखील केला. हा प्रकार संबंधित बालकाच्या आई नाजमी बी यांच्या लक्षात आल्यानंतर या महिलेने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. नागरिकांनी बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले व तत्काळ खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू

वर्षभरात घडल्याहेत ४७० घटना

जळगाव शहरात सुमारे १६ हजारावर मोकाट कुत्रे आहेत. दररोज मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यामुळे अनेक नागरिक देखील जखमी होत आहेत. गेल्या वर्षभरात शहरातील ४७० जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका नऊ महिन्याच्या मुलाचा मृत्यू देखील झाला होता. तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच एका शेतकऱ्याच्या तोंडाचा जबडा देखील मोकाट कुत्र्यांनी तोडला होता. जळगावकरांकडून अनेकदा मागणी करुन देखील महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

करोनाची साखळी तोडण्यासाठी गावची सीमा केली सील; बाहेरच्यांना नो एन्ट्री

Source link