Home शहरे औरंगाबाद अंजना नदीला आलेल्या पुरात दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा येथे घडली.

अंजना नदीला आलेल्या पुरात दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा येथे घडली.

औरंगाबाद :अंजना नदीला आलेल्या पुरात दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा येथे घडली.
या पैकी एका वनरक्षकांचा मृतदेह आढळून आला आहे तर एन डी आर एफ च्या जवाणाकडून दुसर्‍या वनरक्षकांची शोध मोहीम सुरू आहे. राहुल दामोदर जाधव असे मृतदेह आढळून आलेल्या वनरक्षकांचे नाव आहे. व अजय संतोष भोई असे बेपत्ता वनरक्षकांचे नाव आहे.भारबा जैतखेडा भागात कार्यरत असलेले वन कर्मचारी हे रात्री पावसात पिशोरकडे जात होते.

दरम्यान कोळंबी नदीवरील पुल पार करत असताना पुलावरुन वाहणार्‍या पाण्याच्या वेगामुळे दोघेही दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन दोघे सापडले आज ( रविवारी )सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी 11 वाजेच्या दरम्यान भारबा-पिशोर रोडपासून एक किलोमीटर अंतरावर राहुल दामोदर जाधव (वय 30) रा.सिंदखेडराजा यांचा मृतदेह आढळून आला. तर दुसर्‍याचा शोध सुरू आहे. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहे.एन डी आर एफ च्या जवाणाकडून शोध मोहिम सुरूच आहे . घटनास्थळी औरंगाबाद प्रादेशिक वनविगाचे उपवनसंरक्षक वडसकर, सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे , वनपरिक्षेत्र अधिकारी काझी , वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके , वनपाल बलाडे , प्रविण पारधी , प्रविण कोळी , परदेशी जी एन ,घुगे , मनोज उधार , वनरक्षक नारायण ताठे , ्प्रविण कांबळे , वाघमारे , चक्रे , गणेश पवार , ,योगेश महाजन , अकब्बर शेख , नितीन घोडके , समाधान पाटील , संजय माळी , सुभाष भोजणे , दत्तु जाधव यांनी संपूर्ण नाल्यात फिरसती करुन शोध कार्य केले . मात्र यांना यश आले नाही.अखेर औरंगाबाद येथून अगणी शामक दल घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे .