हायलाइट्स:
- सुशांतच्या पुण्यतिथीआधी अंकिताची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
- काही दिवसांपूर्वीच अंकितानं सोशल मीडियावर घेतला होता ब्रेक
- अंकिता लोखंडेच्या फोटोच्या कॅप्शन घेतंय सर्वांचं लक्ष वेधून
अंकिता लोखंडे यशस्वी टीव्ही करिअरनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कंगना रणौतसोबत ती ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात ती झळकली. या चित्रपटातील आपल्या लहानश्या भूमिकेतूनही तिनं आपला ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. आज सुशांत या जगात नसला तरी अंकिता नेहमीच त्याच्या आठवणींना उजाळा देताना दिसते. अशात तिनं आता इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्याचं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अंकिता समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली दिसत आहे. यावेळी रेड जॅकेट आणि लोअर असे साधेच कपडे परिधान केले होते. या फोटोमध्ये ढगांनी भरून आलेलं आभाळ दिसत आहे तर अंकिता या भरलेल्या आभाळाकडे पाहताना दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अंकितानं हा फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शन दिलं आहे. तिनं लिहिलं, ‘अंतर किती आहे हे महत्त्वाचं नाही कारण शेवटी आपण सर्व एकाच आभाळाखाली उभे असतो.’ अंकिताचं हे कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमधून अंकिता सुशांतला खास मेसेज देत असल्याचा अंदाज अनेक चाहते लावताना दिसत आहेत. अंकिताच्या या फोटोवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
अंकिता लोखंडेनं ३ जून रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे तिचे चाहतेही हैराण झाले होते. आपल्या या पोस्टमध्ये अंकितानं आपण काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर जात असल्याचं म्हटलं होतं. या फोटोसोबत तिनं लिहिलं होतं, ‘हा निरोप नाहीये आपण पुन्हा भेटणार आहोत.’ तिच्या अशा पोस्टनंतर तिचे चाहते हैराण झाले होते.