Home बातम्या महत्वाच्या बातम्या अंधांना नोटा ओळखता येणार; आरबीआय आणणार अॅप

अंधांना नोटा ओळखता येणार; आरबीआय आणणार अॅप

नवी दिल्ली: दृष्टीहीन व्यक्तींना नोटा ओळखण्यास मदत व्हावी यासाठी आरबीआय(रिझर्व्ह बँक) एक अॅप आणणार आहे. रोखीचे व्यवहार अजूनही मोठ्या प्रमाणात होत असून, त्या दृष्टीनं बँकेनं हे पाऊल उचललं आहे. दृष्टीहीन व्यक्तींना रोखीचे व्यवहार करणे सोयीचे व्हायला हवे. त्यासाठी त्यांना नोटा ओळखता येणे गरजेचे आहे, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. दृष्टीहीन व्यक्तींना दैनंदिन व्यवहारामध्ये नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणींच्या मुद्द्यावर आम्ही संवेदनशील आहोत. म्हणूनच मोबाइल अॅप विकसित करणाऱ्या कंपनीच्या शोधात आहोत. या अॅपमुळे जुन्या तसेच नव्या सिरिजच्या नोटा ओळखता येणार आहेत, असेही बँकेने सांगितले. रिझर्व्ह बँकेने अॅप तयार करण्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. बँकेने याआधीही अशा प्रकारे निविदा मागवल्या होत्या. देशात जवळपास ८० लाख दृष्टीहीन व्यक्ती आहेत. आरबीआयच्या या अॅपमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.