Home शहरे अकोला अंधेरी (पूर्व) मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती – महासंवाद

अंधेरी (पूर्व) मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती – महासंवाद

0
अंधेरी (पूर्व) मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती – महासंवाद

मुंबई उपनगर, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने १६६ – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२-८८६-७१७ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५३६ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील.

पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३५५-८७३-९२६ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५७३ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत जनतेला भेटतील.

त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.सत्यजित मंडल  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५९१-३८३-९१५ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५६१ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.

येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघात मतदान होत असून या भागातील सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि लोकशाही सुदृढ करावी, असे आवाहनही श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे

0000