मुंबई, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी (पूर्व) विधानसभा‘ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व‘ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाने एका अधिसूचनेद्वारे कळविले आहे.
000