अंधेरी (पू) पोटनिवडणुकीसाठी ७ अर्ज; १४ पैकी ७ उमेदवारांची उमेदवारी मागे

अंधेरी (पू) पोटनिवडणुकीसाठी ७ अर्ज; १४ पैकी ७ उमेदवारांची उमेदवारी मागे
- Advertisement -

मुंबई दि. १७ :  महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. आज दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजेपर्यंत सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :

१. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री. साकिब जफर ईमाम  मल्लिक (अपक्ष)

४. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

५. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

६. श्री. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

७. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

अंतिम लढतीसाठीचे उमेदवार :

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

३. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

७. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

==

(क्र.मुउजि/प्रमाक/वा/००७)

 

- Advertisement -