अंबरनाथमधला गॅसवाला वेब सीरिज, मालिकेत दिसला तर नवल वाटायला नको!

अंबरनाथमधला  गॅसवाला वेब सीरिज, मालिकेत दिसला तर नवल वाटायला नको!
- Advertisement -


मुंबई: सध्या वेब सीरिजमध्ये नवनवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. छोटीशी भूमिका साकारणारे किंवा फारसे न चमकलेले कलाकार निवडले जातात. सोशल मीडियावर झळकलेले चेहरे देखील आता वेब सीरिजमध्ये किंवा मालिकेत दिसतात. त्यामुळे सोशल मीडियाची ताकद काय असते? यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं तिचं आयुष्य बदललं. आता सोशल मीडियावर अशाच एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

अंबरनाथमधील गॅस एजन्सीत घरोघरी जाऊन गॅस सिलेंडर पोहोचवणार गॅसवाला आता सोशल मीडियावर ‘सिलेंडरमॅन’ झाला आहे. सागर जाधव (Sagar Jadhav)असं या तरुणाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे फोटो व्हायरल होतायत. व्हायरल होण्याचं खास कारण म्हणजे त्याची पर्सनॅलिटी. पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनमध्ये नेटकरी आता मालिका आणि वेबसीरिजमधला विलन , खलनायक शोधत आहेत.


एखाद्या वेब सीरिजमध्ये असतो तसाच खलनायक दिसतोय, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. सागर जाधवच्या व्हायरल फोटोंवर मराठी सिनेसृष्टीतल अनेक कलाकारांनी सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दिग्दर्शक अक्षय इंडीकर यानं देखील सागर जाधवच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘एखाद्या वेब सीरिज किंवा मालिकेची ऑफर आल्यास काम करायला नक्की आवडेल’, असं सागर जाधवनं म्हटलं आहे.

त्यामुळे आता सागर जाधव आता एखद्या सीरिजमध्ये किंवा मालिकेत दिसला तर नवल वाटायला नको, असंच म्हणावं लागेल.





Source link

- Advertisement -