Home ताज्या बातम्या अक्षयगंगा मंडळाच्या वतीने आदर्श माता जिजाऊ पुरस्कार देवून महिलांचा गौरव

अक्षयगंगा मंडळाच्या वतीने आदर्श माता जिजाऊ पुरस्कार देवून महिलांचा गौरव

बीड :
अक्षयगंगा प्रासादिक मंडळाच्या वतीने जुनी भाजी मंडई येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये गुरूपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. यशवंत महाराज तालखेडकर, दै.दिव्य मराठीचे ब्युरोचीफ दिनेश लिंबेकर, पत्रकार नारायण नागरे,  तबला वादक दत्तात्रय काळे, यांची उपस्थिती होती. 
प्रती वर्षाप्रमाणे यंदाही अक्षयगंगा प्रासादिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये यशस्वीरित्या संस्कार करून अध्यात्म क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा आदर्श माता जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ह.भ.प.यशवंत महाराज तालखेडकर म्हणाले. सद्गुरूशिवाय माणूस जीवनात यशस्वी होवू शकत नाही. आई-वडिल आणि गुरू हे आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत. गुरूमुळे आपले जीवन यशस्वी आणि कृतार्थ होते. संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीमधील विविध दृष्टांताद्वारे त्यांनी गुरूचे महत्त्व विषद केले. यावेळी अक्षयगंगा प्रासादिक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, शाल, पुष्पहार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ह.भ.प.यशवंत महाराज तालखेडकर व सौ.रत्नमाला तालखेडकर यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श माता जिजाऊ पुरस्कार देवून नऊ महिलांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये सौ.अमृतबाई राजपूत, श्रीमती रामप्यारी कासट, श्रीमती सुरज प्रेमसुख मंत्री, सौ.कमल रमेश भोसले, श्रीमती हिराबाई डावकर, श्रीमती सुशिला जाधव, श्रीमती अयोध्या बहीर, श्रीमती रंजना सोळंके यामध्ये यांचा समावेश आहे. यावेळी पत्रकार दिनेश लिंबेकर, नारायण नागरे, साळुंके, आणि दत्तात्रय काळे यांनी आपल्या मनोगतात अक्षयगंगा प्रासादिक गंगा मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्तुत्य उपक्रमाविषयी कौतूक केले. यावेळी दिनेश लिंबेकर यांनी अक्षयगंगा प्रासादिक मंडळाच्या वतीने ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा चांगला उपक्रम असून यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शोभा झेंड यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय काळे यांनी केले. कार्यक्रमात प्रा.राहुल पांडव, गिराम नाना, मनोज गोटे, बहीरमल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सौ.सुंदरबाई नाईक, संगीता गिराम, कांचन तापडिया, शिला ठाकूर, इंदुमती पिंगळे, संगीता जगताप, रेखा बुंदिले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.