अक्षय कुमारच्या मागे उभा राहून शाहरुखने केली फील्डिंग, क्रिकेट खेळतानाचा Photo Viral

अक्षय कुमारच्या मागे उभा राहून शाहरुखने केली फील्डिंग, क्रिकेट खेळतानाचा Photo Viral
- Advertisement -


मुंबई- शाहरुख खान आणि अक्षय कुमार आज बॉलीवूडमधील सुपरस्टार्सपैकी एक आहेत. दोघांनी ‘दिल तो पागल है‘ मध्ये एकत्र काम केले होते. मात्र, या चित्रपटात अक्षयने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. दरम्यान सिनेमाच्या सेटवरील एक थ्रोबॅक फोटो चर्चेत आला आहे. यात अक्षय आणि शाहरुख क्रिकेट खेळताना दिसत आहेत. अक्षय फलंदाजी करत आहे तर शाहरुख यष्टीरक्षण करण्यात मग्न आहे. दोघांनीही कॅज्युअल कपडे घातले आहेत. यावरूनच दोघं फावल्या वेळात क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत असल्याचं दिसतं.

कथा आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध ‘दिल तो पागल है’

‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. बॉलिवूडमधील सर्वाधिक पसंतीच्या सिनेमांमध्ये या सिनेमाचा आवर्जुन उल्लेख होतो. रोमँटिक कथानकाव्यतिरिक्त हा सिनेमा गाण्यांसाठी देखील ओळखला जातो.

आता या सिनेमांमध्ये दिसतील शाहरुख आणि अक्षय

दोघांच्याही सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख आता सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. तर अक्षय लवकरच ‘बेल बॉटम’ आणि ‘सूर्यवंशी’ सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

- Advertisement -