Home बातम्या अखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार… उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

अखेर बाळासाहेबांचे स्वप्न साकार… उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

0

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीच्या सरकारचा शपथविधी गुरुवारी शिवतीर्थावर पार पडलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसहीत सात मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.  हा सोहळा स्मरणीय करण्यासाठी शिवसेनेकडून तयारीत कोणतीही कसूर ठेवण्यात आलेली नाही. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शपथविधीसाठी खास असे व्यासपीठ उभारले आहे. एकूणच शिवाजी पार्कमधील आजचा सोहळा हा लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

असा संपन्न झाला शिवतीर्थावर शपथविधी सोहळा 

​* शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच निघून गेले.

​* महाराष्ट्रात ‘ठाकरे राज’; उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांचा शपथविधी संपन्न

* काँग्रेसच्या नितीन राऊत यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

* काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

* राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

* शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

* एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरेंना स्मरून घेतली मंत्रिपदाची शपथ