अखेर माण खटाव चे युवा नेते शेखर गोरे बनले शिवसैनिक

- Advertisement -

माण खटाव : डॉ विनोद खाडे दुष्काळी खटाव माण मधील जनतेला ऐन दुष्काळात युवा नेते शेखर गोरे यांनी पदरमोड करून पाण्याचे टँकर,पाणी फाउंडेशन कामी जे सी बी, व पोकलेन मशीन,आर्थिक मदत देवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. खटाव व माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेखर गोरे यांनी विविध स्वरूपात मदत केली आहे.
अशा या दानशूर युवा नेत्याला काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अपमानास्पद रीत्या बाहेर पडावं लागलं.खटाव माण मधील मरगळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ला चैतन्य प्राप्त करून दिलं, पण अंतर्गत कुरघोडी मुळे शेखर गोरेनी तत्कालीन फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष शरद पवार यांना थेट व्यासपीठावर जाऊन जाब विचारला होता.


मात्र शेखर गोरे यांनी त्यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उत्तम रीत्या तयार केली असून राजकारनाला समाज कारणांची जोड दिली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांनी ज्या पक्षाचे” 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाज कारण”हे ब्रीदवाक्य आहे अशा शिवसेना पक्षांत नुकताच प्रवेश करून शिवबंधन धागा हातात बांधला. मुंबई वांद्रे येथील मातोश्री या ठिकाणी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांचा शिवसेना प्रवेश हा कार्यकर्त्यांना चैतन्य देणारा तर विरोधकाना धडकी भरवणारा ठरणार हे नक्की

- Advertisement -