हायलाइट्स:
- सुशांतच्या शेवटच्या इच्छेचा प्रतीक बब्बरने केला खुलासा
- सुशांतला होती ग्रह- ताऱ्यांची आवड
- प्रतीकने सुशांतसोबत केलं होतं ‘छिछोरे’ चित्रपटात काम
‘अजूनही बरसात आहे’ मधून मुक्ता- उमेश घेऊन येत आहेत नवी कथा
प्रतीक आणि सुशांत यांनी ‘छिछोरे’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले होते. तेव्हा गप्पा मारत असताना सुशांतने प्रतीकला त्याच्या या इच्छेबद्दल सांगितलं होतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुशांतबद्दल बोलताना प्रतीक म्हणाला, ‘सुशांत आणि माझी भेट एका कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर आम्ही ‘छिछोरे’ केला. तेव्हा आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. आम्ही एकमेकांसोबत खूप गप्पा मारायचो. सुशांतला चंद्र, तारे आणि ग्रह यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं. तो नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असे. एकदा गप्पा मारत असताना त्याने मला सांगितलं होतं की, त्याला अंटार्क्टिकला जायचं आहे.’
सुशांतने भविष्यात केलेल्या नियोजनाबद्दल सांगत प्रतीक म्हणाला, ‘अंटार्क्टिकामधून त्याला आकाश पाहायचं होतं. ‘छिछोरे’ चित्रपट संपल्यावर मी तिथे जाईन, असं तो म्हणाला होता. पण त्यापूर्वीच तो आपल्याला सोडून निघून गेला.’ सुशांतला ग्रह आणि ताऱ्यांबद्दल किती आकर्षण होतं हे त्याच्या चाहत्यांना माहीत आहे. सुशांत नेहमीच त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. आपल्या दुर्बिणीमधून ताऱ्यांना पाहतानाचे अनेक फोटोही सुशांतने चाहत्यांसोबत शेअर केले होते. परंतु, त्यांना जवळून पाहण्यासाठी अंटार्क्टिकेला जाण्याची त्याची इच्छा मात्र अपूर्णचं राहिली.
लोणावळ्यात काय घडलं होत? अखेर ‘द फॅमिली मॅन २’ च्या गुपिताचा निर्मात्यांनी केला खुलासा