Home गुन्हा अग्नि शस्त्र बरोबर घेऊन फिरणाऱ्यास अटक

अग्नि शस्त्र बरोबर घेऊन फिरणाऱ्यास अटक

0

परवेज शेख दि.10 रोजी युनिट १ कडील पो हे कॉ बरकडे, , इरफान मोमीन , वाघवले, पो कॉ तुषार मालवदकरअसे युनीट-१ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोना वाघवले व पोना इरफ़ान मोमीन यांना बातमी मिळाली की एक इसम शिवीजीनगरमधील दळवी हॉस्पीटलचे जवळ घातक अग्नीशस्र बरोबर घेऊन फिरत आहे.


प्राप्त बातमीनुसार सापला रचून संशयीतास ताब्यात घेऊन चौकशी करता तो इसम नामे अंबाजी कल्याणी शिंगे, मूळचा कर्नाटक राज्यातील असुन हल्ली रा बी टी कवडे रोड पुणे , वय २० असा असल्याचे सांगत आहे.


त्यास लगेच ताब्यात घेतले असता. त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस असा किंमत रुपये ३५,४००/- चा मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


सदरची कारवाई ही मा श्री अशोक मोराळे सााे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, मा श्री बच्चनसींग सााे पोलीस उपायुक्त गुन्हे व मा शिवाजी पवार सााे सहा. पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणयात आली आहे.