अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? फडणवीस म्हणाले…

अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? फडणवीस म्हणाले…
- Advertisement -

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे यांच्याशी माझे उत्तम वैयक्तिक संबंध
  • देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा
  • अजित पवारांचं योगदान नाकारता येणार नाही – फडणवीस

मुंबई: ‘अजित पवार मुख्यमंत्री होण्यास सक्षम आहेत का, यावर आज चर्चा करण्याची गरज नाही. आज महाराष्ट्रापुढं वेगळे आणि अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा महत्त्वाचे प्रश्न आहेत,’ असं सांगत, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं आहे.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. अजित पवार यांच्याशी आपले कसे संबंध आहेत, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्याबाबत फडणवीस यांनी सावध उत्तर दिलं. ‘अजित पवारांची एक शैली आहे. त्यांच्या काही गोष्टींबाबत दुमत असेल किंवा काही भूमिकांना आमचा विरोध आहेच. पण ते इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांचं राजकीय योगदान आहेच. ते नाकारता येणार नाही.’

वाचा: रेमडेसिवीर वाटप प्रकरण विखे पाटलांची पाठ सोडेना, हायकोर्टानं दिले ‘हे’ आदेश

उद्धव ठाकरे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ‘आम्ही राजकीय विरोधक आहोत, तेही आता विरोधकांच्या भूमिकेत आलो आहोत. त्याआधी २५ वर्षे आम्ही मित्र होतो. आता त्यांनी वेगळा मार्ग निवडलाय, त्यामुळं आम्ही समोरासमोर आहोत. असं असलं तरी त्यांना शुभेच्छाही देऊ शकत नाही अशी परिस्थिती नाही. मी कधीही फोन करून त्यांच्याशी बोलू शकतो. ती महाराष्ट्राची संस्कृतीच आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारनं धाडसी निर्णय घेण्याची गरज

महाविकास आघाडी सरकार अपेक्षित गतीनं काम करते आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. ‘महाराष्ट्राची क्षमता अमर्याद आहे. अनेक बाबतीत राज्य वेगाने प्रगती करू शकते. पण सध्या तशी वाटचाल सुरू नाही. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र थांबलाय. राज्याला गती देण्याची गरज आहे. एक वर्षे थांबलो तर राज्य पाच वर्षे मागे जातो. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी धाडसी निर्णय घ्यायचे असतात. टीका सहन करण्याची तयारी ठेवायची असते. तसे निर्णय कुठंतरी घेतले पाहिजेत,’ अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

वाचा: ‘पेगॅसस’ ही CBI, ईडीची जोड शाखा; शिवसेनेनं ‘असं’ जोडलं कनेक्शन

Source link

- Advertisement -