Home गुन्हा अजित पवार यांना दिलासा; सिंचन घोटाळ्याची एसीबीची चौकशी तूर्तास बंद

अजित पवार यांना दिलासा; सिंचन घोटाळ्याची एसीबीची चौकशी तूर्तास बंद

0

मुंबई: राज्यातील राजकारणात अजित पवारांच्या बंडामुळे मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपासोबत हातमिळवणी करत शनिवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज मोठी घटना घडली आहे. सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९ प्रकरणांमध्ये अजित पवार यांना तूर्तास क्लीन चिट दिली आहे. एसीबीने याबाबतचे पत्र अमरावतीचे एसीबीचे पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्प घोटाळ्याची उघड चौकशी बंद करण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्याती 9 प्रकरणातील उघड चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी दिले आहेत.