Home शहरे पुणे अज्ञात चोरट्याकडुन विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या चोरी

अज्ञात चोरट्याकडुन विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या चोरी

0

अज्ञात चोरट्याकडुन विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या चोरी.

पुणे : परवेज शेख बारामती : बारामती येथे वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत फिर्यादी घनशाम घोडके (वय ४०, वडगांव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे) यांच्या मौजे सोरटेवाडी गावचे हद्दीत स्वरा हॉटेल बियर बार व परमिट रूम येथे ३० ऑक्टोबर रात्री १०.३० ते ३१ ऑक्टोबर सकाळी ११.३० या दरम्यान एका अज्ञात चोरट्याने विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या चोरल्या.

माहितीनुसार, स्वरा हॉटेलचे शटर कोणीतरी, कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आतून विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचा साठा व सी.सी.टी.व्ही.चे डीव्हीआर मशिन असा एकूण २,४३,५०९/- रूपयांचा माल घरफोडी करून चोरला आहे.
अधिक तपास वडगांव पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक लांडे करीत आहेत.