Home शहरे पुणे अट्टल चैन स्नॅचर अलंकार पोलिसांच्या जाळ्यात

अट्टल चैन स्नॅचर अलंकार पोलिसांच्या जाळ्यात

0

पुणे : अलंकार पोलीस स्टेशनचे तपास पथक नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादीसोबत घटनास्थळी जाऊन शोध घेत असता फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या मोपेडसह एक व्यक्ती संशयास्पदरित्या रिलायन्स मॉलसमोरील हिमाली सोसायटीच्या रोडवरून जाताना आढळला. सदर इसमास तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रफ़ुल चव्हाण व राजेंद्र लांडगे यांनी ओळखून ताब्यात घेतले. त्याचे नाव संजय श्रीधर घुले असून, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत ३ व डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत १ चैन स्नॅचिंग असे एकूण ४ चैन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याच्याकडून एकूण अंदाजे ३,०७,२००/- रुपये किमतीचे ०९६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करून उत्तम कामगिरी केली.

सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग मा. श्री. श्रीकांत तरवडे साो., पोलीस उप आयुक्त मा. श्रीमती पौर्णिमा गायकवाड, सिंहगड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. पी.डी. राठोड साो., अलंकार पोलीस स्टेशनच्या वपोनि श्रीमती कल्पना जाधव, पोनि (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोना बाबुलाल तांदळे, प्रफुल चव्हाण, राजेंद्र लांडगे, किरण राऊत, संदीप धनवटे, योगेश बडगे, ओंकार शिंदे, प्रशांत शिंदे यांनी केली.