Home शहरे औरंगाबाद अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले

अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले

0

 औरंगाबाद :शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून, शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास सिडकोत एका महिलेच्या गळातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.

सिडको एन-पाच येथील विजयश्री कॉलनी येथील संध्या सुभाष रापतवार या गुलमोहर कॉलनी येथे मैत्रिणीकडे गेल्या होत्या़ मैत्रिणीच्या घराकडून विजयश्री कॉलनीकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी संध्या यांना अडवून त्यांच्या गळ्यावर जोराचा हात मारून मंगळसूत्र हिसकावले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने संध्या भयभीत झाल्या. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी रापतवार यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़