पुणे : परवेज शेख
दि.२७/०८/२०१९ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन हदीत मालधक्का चौक येथील रेल्वे हॉस्पीटलसमोरील फुटपाथवर आई वडीलासमवेत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीस, पहाटे ५.०० वा.चे
सुमारास पळवून नेले होते. रेल्वे पोलीस ना सदर मुलगी पुणे रेल्वे स्टेशनचे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे डब्यात जखमी अवस्थेत मिळुन आली होती. रेल्वे पोलीसांनी तिला ससुन हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले
होते. तिच्यावर ससुन हॉस्पीटलमध्ये उपचार चालू असताना अडीच वर्षाची मुलगी मयत झाल्याने रेल्वे पोलीसांनी अकस्मात मयत दाखल केला. त्यावरून बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात
आला.
गुन्हयाचा तपास करताना आरोपी बाबत माहिती मिळून आल्याने, त्यास पुणे स्टेशन परिसरातुन ताब्यात घेवून, त्याचेकडे तपास केला असता, त्याने जुन्या भांडणाच्या रागातुन हा गुन्हा केल्याचे सांगत
आहे. आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी श्रीकांत तरडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री शिरीष सरदेशपांडे, पोलीस उप आयुक्त परि-, श्री रविंद्र रसाळ सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनचे श्री सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकाने श्री.संदीप जमदाडे, सहा पोलीस निरीक्षक व तपास पथकाने केलेली आहे. महिला पोलीस उप-निरीक्षक प्रियंका गायकवाड या गुन्हयाचा तपास करीत आहेत