Home ताज्या बातम्या अण्णा हजारेंची प्रकृती अस्थिर, शिरूर येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये केले दाखल

अण्णा हजारेंची प्रकृती अस्थिर, शिरूर येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये केले दाखल

0

शिरूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्थिर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्दी, खोकला आणि अस्वस्थ वाटत असल्याने शिरूर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये अण्णा हजारे यांना दाखल केले आहे. अण्णांच्या छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे वेदांता हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले आहे.

सर्दीमुळे अण्णांना छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे त्यांना खोकला आणि अशक्तपणा आला आहे. अण्णांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना राळेगण सिद्धि येथून शिरूर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉक्टरांच्या एक पथकाने अण्णांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी हजारे यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अण्णा हजारे यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या वर्षी जुलै महिन्यात माहिती अधिकार कायद्यात दुरुस्तीला परवानगी दिल्याच्या एका दिवसानंतर हजारे म्हणाले होते की, केंद्र सरकार हे पाऊल उचलून भारतीय नागरिकांची फसवणूक करत आहे. नुकतीच त्यांनी घरकुल घोटाळ्याचा तपास करणारे अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते.