अत्युच्च कामगिरीचा मानदंड

- Advertisement -

पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांना आज स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आलं .

पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल जाधव यांचा यापूर्वी 2001 मध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. 2009 मध्ये पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे गौरव पदक त्यांना प्रदान करण्यात आलं. पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सलग तीनवेळा राष्ट्रपती पदक मिळवणारे राम जाधव हे राज्यातील एकमेव आधिकारी ठरले आहेत.

सातारा जिल्ह्यातलं पुसेगाव हे त्यांचं मूळ गाव. सध्या ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, दहशतवाद प्रतिबंधक पथक येथे यांनी चमकदार कामगिरी केलीय. संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडून काढली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केलेल्या प्रमोद माळवदकर, रॉबर्ट साळवे, श्याम दाभाडे, मोबीन शेख, महाकाली ढोकलिया अशा सोळा गुंडाचं त्यांनी एन्काऊंटर केलं.

- Advertisement -