हायलाइट्स:
- अनिल कपूर यांच्या लोकप्रियतेमुळे हर्षवर्धनला करावा लागतोय अडचणींचा सामना
- ‘रे’ वेबसीरिजमधील हर्षवर्धनच्या भूमिकेचं होतंय कौतुक
- अनिल यांचा मुलगा असल्याने काही लोकांना आवडत नाही हर्षवर्धन
‘मी दिलीप कुमार यांची आजन्म ऋणी आहे, कारण…’; शगुफ्ता अली यांनी जागवल्या आठवणी
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रे’ या वेबसीरिजमध्ये हर्षवर्धन महत्वाच्या भूमिकेत आहे. वेबसीरिजमधील हर्षवर्धनच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होतं आहे. परंतु, व्यावसायिक चित्रपटांपासून दूर असूनही काही लोक त्याचा रागराग करतात, असं हर्षवर्धनचं म्हणणं आहे. एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन म्हणाला, ‘मी वेगळा आणि एकाच पद्धतीचे चित्रपट न करण्याचा मार्ग निवडला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना फारसं माहित नसतं किंवा मीडिया त्याकडे फारसं लक्ष देत नाही. मी माझ्या पद्धतीने काम करतोय. खूप लोक माझं काम बघतात आणि त्यांना कळतं मला कोणत्या पद्धतीचं काम करायला आवडतं.’
अनिल यांचा मुलगा असण्याबद्दल हर्षवर्धन म्हणाला, ‘लोकांना मी न आवडण्याचं कारण काही वेगळंच आहे. मी कितीही चांगलं काम केलं, कितीही चांगले चित्रपट केले, जीवनात खूप काही मिळवलं तरीही काही लोकांना मी आवडत नाही कारण मी अनिल कपूर यांचा मुलगा आहे. त्यामुळे ते माझा रागराग करतात. मी एक शांत मुलगा आहे. मी रोज जीमचे कपडे घालून कॅमेरासमोर पोज नाही देऊ शकत. मला ते जमणार नाही. मला माझी वैयक्तिक शांतता आवडते. मी चित्रपट करेन त्याबद्दल बोलेन आणि गुपचूप घरी निघून जाईन. ‘
सुनील बर्वेंच्या लेकीच्या लग्नातील व्हिडीओ पाहून व्हाल भावुक