हायलाइट्स:
- अनिल कपूर यांनी लाडक्या लेकीला दिल्या हटके शुभेच्छा
- सोनमचे बालपणीचे फोटो शेअर करत लिहिला खास मेसेज
- मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी अनिल यांना येतेय मुलीची आठवण
किस्सा- हिमेश रेशमियाच्या वक्तव्यामुळे भडकल्या होत्या आशाताई
अनिल यांनी शेअर केलेले फोटो सोनमचे बालपणीचे फोटो आहेत. एका फोटोत सोनम अनिल यांच्या मांडीवर आहे. सोनम आपल्या वडिलांच्या मांडीवर खेळण्यात व्यग्र आहे. दुसऱ्या फोटोत ती तिच्या आईच्या हातात आहे आणि समोर अनिल उभे आहेत तर तिसऱ्या फोटोत ती तिच्या आई- वडिलांसोबत केक कापताना दिसतेय. चाहत्यांना देखील लहानपणीची गोंडस सोनम भावली.
हे फोटो पोस्ट करत अनिल यांनी लिहिलं, ‘नेहमी आपल्या स्वप्नांच्या पाठी धावणारी आणि आपल्या मनात येईल ते ऐकणारी मुलगी सोनम कपूर, तुला प्रत्येक दिवशी लहानाचं मोठं होताना पाहणं आई- वडील म्हणून आमच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं होतं. मी खूप नशीबवान आहे की मला अशी मुलं मिळाली. तू कणखर आहेस जसं तू असायला हवं.’
यासोबत आपल्या जावयासाठीही अनिल यांनी खास मेसेज लिहिला आहे. त्यांनी लिहिलं, ‘तुझ्याकडे एखादी गोष्ट आपल्यात सामावून घेण्याची कला आहे आणि मला ती गोष्ट खूप आवडते. तू आणि आनंद तिकडे आनंदात राहा आणि काळजी घ्या. तुम्हाला पुन्हा भेटण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला तुझी खूप आठवण येतेय.’ अशा शब्दात अनिल यांनी सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत.