Home शहरे अहमदनगर अनुदानासाठी तहसीलदारांना निवेदन

अनुदानासाठी तहसीलदारांना निवेदन

नेवासाफाट: राज्यशासनाने यापुर्वीच जाहीर केलेले विविध अनुदानासह दुष्काळ निधी अद्यापही न मिळाल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशा आशयाचे निवेदन भारतीय जनसंसदने मुख्यमंत्र्यांच्या नावे ते तहसीलदारांमार्फत देण्यात आले.

नेवासा तालुक्‍यातील ज्या गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, त्यांना 2015-16 चे दुष्काळी अनुदान देऊ असे जाहीर करुनही ते 3 वर्षांतही मिळाले नाही त्याबाबत तीनदा लेखी निवेदने देऊनही दखल घेतली नाही. अनुदान जाहीर केल्याप्रमाणे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने द्यावे ,असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन नायब तहसीलदार संजय परदेशी यांनी स्विकारले. यावेळी भारतीय जनसंसदचे नेवासा तालुकाध्यक्ष रामराव भदगले, डॉ.अशोकराव ढगे, ऍड.विठ्ठलराव जंगले, कारभारी गरड, एस.आर. शिंदे, डॉ. रजनीकांत पुंड, शिवाजी चव्हाण, दिलीप सरोदे, नवनाथ फुलारी, दिलीप मापारे आदिंसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.