हायलाइट्स:
- अनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म ‘घोस्ट स्टोरीज’ वादाच्या भोवऱ्यात
- शॉर्ट फिल्ममधील एका सीनवर प्रेक्षकांनी घेतला आक्षेप
- अनुराग कश्यपच्या ‘घोस्ट स्टोरीज’च्या विरोधात तक्रार दाखल
राज कुंद्राच नाही तर ‘या’ सेलिब्रेटींना झालाय तुरुंगवास
अनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म ‘घोस्ट स्टोरीज’मध्ये अभिनेत्री सोभिता धूलिपाला हिच्या व्यक्तिरेखेचा एका सीन आहे. या सीनमध्ये ती गर्भपात झाल्यानंतर भ्रूण खाताना दाखवण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं काही नियम तयार केले आहेत. ज्यात डिजिटल मीडिया आचारसंहिंतेसाठी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यानुसार सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना दर्शकांच्या तक्रारींसाठी आणि त्यातील सीनमधील चुका दुरुस्त करण्याच्या सल्ल्यांसाठी एक मॅकनिजम तयार करण्यास सांगण्यात आलं होतं. हे नियम लागू झाल्यानंतर काही महिन्यातच नेटफ्लिक्स इंडियाकडे अनुराग कश्यपच्या ‘घोस्ट स्टोरीज’च्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार करणाऱ्या व्यक्तीनं अभिनेत्री सोभिता धूलिपाला हिच्या सीनवर आक्षेप घेत या कथेत त्या सीनची गरज नव्हती असं म्हटलं आहे. या नंतरही जर निर्मात्यांना तो सीन शॉर्ट फिल्ममधून वगळायचा नसेल तर त्यांनी गर्भपाताचा अनुभव आलेल्या महिलांसाठी एक वॉर्निंग ट्रिगर द्यायला हवी. अर्थात सध्या तरी ही तक्रार नेटफ्लिक्सच्या ग्रीवेंस रिड्रेसल ऑफिसरांकडेच दाखल करण्यात आली आहे.
शिल्पाला राजशी करायचं नव्हतं लग्न, पण घर घेऊन केलं इम्प्रेस
अनुराग कश्यपची शॉर्ट फिल्म ‘घोस्ट स्टोरीज’ एक एंथॉलजी हॉरर फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं आहे. ज्यात ४ वेगवेगळ्या कथा एकत्र आणण्यात आल्या आहेत.