अनेकदा आत्महत्येचा विचार आला पण… जस्मीन भसीनचा धक्कादायक खुलासा

अनेकदा आत्महत्येचा विचार आला पण… जस्मीन भसीनचा धक्कादायक खुलासा
- Advertisement -


मुंबई : ‘बिग बॉस १४’ मुळे प्रसिद्ध झालेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जस्मीन भसीन सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी जस्मीन मजेदार व्हिडीओ शेअर करत असते तसेच स्वतःचे काही ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. जस्मीन भसीन ‘बिग बॉस १४’ च्या घरात तिने आपल्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यात करिअरच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याच ठिकाणांहून नकार आल्यानंतर जस्मीनच्या डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार सुरू केला होता, असे तिने सांगिताले होते. या निराशाजनक विचारांतून बाहेर येण्यासाठी काय केले, त्याबाबत जस्मीनने एका मुलाखतीमध्ये मोकळेपणाने सांगितले आहे.

जस्मीनने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘ मी ब-याच वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात खूप कठीण काळ होता. मी मुंबईत येऊन काम शोधत होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता कारण माझे स्ट्रगल सुरू होते. माझी लढाई स्वतःशीच होती. मी छान दिसत नाही, म्हणून मला नेहमीच नकार मिळतो… यामुळे माझा आत्मविश्वास कमी कमी होत होता. आपल्यातच दोष आहेत, मी दिसायला चांगली नाही असे मला सतत जाणवायचे आणि त्यातून सातत्याने येणारा नकार यामुळे मी खूप निराश झाले होते. ही निराशा इतकी टोकाला गेली होती की माझ्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. परंतु या निराशाजनक विचारांवर मात केली ‘सेल्फ लव्ह’ अर्थात स्वतःवरील प्रेमाने.’

याबाबत तिने सांगितले, ‘ मी यातून खूप काही गोष्टी शिकले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे. आपल्यातील दोष आपण स्वीकारले पाहिजेत, कारण हेच दोष इतरांपेक्षा आपल्याला वेगळे असल्याची जाणीव करून देतात. अन्यथा आपण दुकांनात ठेवलेल्या बाहुल्यांप्रमाणे एकसारखेच दिसू. जोपर्यंत आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार हे जेव्हा ठरवतो. जे साध्य करायचे आहे त्यासाठी 100 टक्के देणार असे ठरवून प्रयत्न करतो. त्यावेळी यश हे मिळतेच.परंतु जर अपयश मिळाले तर आपण प्रयत्नच नाही केले हा दोष येत नाही. किंबहुना आपल्याला जे हवे असते ते मिळण्यात अडचणी येत नाहीत.

जस्मीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ‘ टशन-ए-इश्क’, ‘दिल से दिल तक’, ‘नागिन’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने ‘बिग बॉस १४’ आणि ‘खतरों के खिलाडी ९’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. ‘बिग बॉस १४’नंतर, जस्मीन ‘तेरा सूट’ आणि ‘तू भी सताया जायेगा’ या दोन म्युझिक व्हिडीओमध्ये तिचा प्रियकर अली गोनीसोबत दिसली होती. या दोन्ही गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे.





Source link

- Advertisement -