Home गुन्हा अनोळखी व्यक्तीच्या खुनातील तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात ,युनिट – ५ च्या पोलिसांची कामगिरी

अनोळखी व्यक्तीच्या खुनातील तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात ,युनिट – ५ च्या पोलिसांची कामगिरी

पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी ) रमेश कांबळे

देहूरोड येथील रेल्वे उड्डाणपूलावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंदाजे ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह देहुरोड पोलिसांना मिळून आला होता.त्यानुसार ८ जून रोजी अज्ञात व्यक्तीचा अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपींनी कलम ३०२ प्रमाणे खून केला असल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट – चे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.,दोन दिवसात मयत व्यक्तीच्या अंगावरील कपड्यावर असलेल्या शिलाईच्या टेलर टॅगवरून मयत व्यक्तीचा तपास लावला. दत्तात्रय कृष्णाजी माचर्ला वय – ४१( रा.शांतीनगर सहयोगनगर भिवंडी मूळ रा.इंद्रा वसाहत ,भवानी पेठ ,घोडगेवस्ती सोलापूर ) असे असल्याचे तपासात नाव निसपन्न झाले. मयताच्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्यांच्या चोरीस गेलेल्या फोनच्या आधारावरून या तीन आरोपींचा शोध लावला असता ते खामगाव येवत येथे असल्याची माहिती मिळाली.आणि युनिट -५ च्या पोलीस पथकाने या अल्पयीन मुलांना ताब्यात घेतले .पुढील तपासकमी या तीन अल्पवयीन मुलांना देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

गुन्हे शाखा युनिट -५ चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जूनला मुंबईकडे पायी जात असताना दत्तात्रय माचर्ला यांनी या तिघा अल्पवयीन मुलांची भक्ती शक्ती चौक निगडी येथे ओळख झाली .ते चालत देहूरोड रेल्वे पुलावर पोचले .त्यावेळी माचर्ला हे पुलावर बसले त्यांना झोप लागली .त्याच वेळी संगनमत करून या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यात दोन वेळा दगड मारून खून केला. आणि त्यांच्या खिशातील पावशे रुपये आणि मोबाईल घेऊन ते सेंट्रल चौक देहूरोड येथून ट्रक पकडून मुंबईला गेले. त्याचवेळी गुन्हे शाखा युनिट -५ चे पोलीस निरीक्षक राम गोमरे ,त्यांचे पोळीस पथक मुंबईला रवाना झाले .दरम्यान माचर्ला यांच्या मुलीने तिच्या वडिलांच्या चौकशी साठी फोन केला होता. त्याचंच धागा पकडून पोलिसांनी तपास लावला , आरोपींची नावे मिळाली होती .हे तीन आरोपी हैद्राबाद आणि येथे मुंबई येथे बालसुधार गृहात एकत्रच होती,तिथे त्यांची ओळख पक्की झाली होती. पैकी एका मुलाने त्याच मोबाईलवरून आपल्या वडिलांना फोन केला होता. दरम्यान त्या फोनचे लोकेशन हैद्राबाद लागले.पोलीस पथक हैद्राबादला पोचले.त्या मुलाच्या वडिलांना विश्वासात घेतले.आणि मुंबई हैद्राबाद , हैद्राबाद मुंबई ,असा अडीच ते तीन हजार किलो मीटरचा प्रवास या पोलीस पथकाने केला.आणि शेवटी ही मुले यवत तालुक्यातील खामगाव येथे असल्याची माहिती मिळाली . आणि पोलिसांनी या तीन बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले.देहूरोड येथे पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता.दत्तात्रय माचर्ला यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली.सदरचे बालगुन्हेगार हे तेलगंणा राज्यातील ,विजयवाडा ,हैद्राबाद ,व रंगारेड्डी या भागातील आहे.

कोणतेही धागेदोरे नसताना अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा लावून या खुनातील तीन बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले . गुन्हे शाखा युनिट -५ चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत ,गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमरे, पोलीस कर्मचारी फारुख मुल्ला,भरत माने,मयूर वाडकर, नागेश माळी, नितीन बहिरट ,ज्ञानेश्वर गाडेकर ,दयानंद खेडकर,धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे,स्वामींनाथ जाधव,धनंजय भोसले ,राजकुमार इधारे, श्यामसुंदर गुट्टे ,गोपाळ ब्रम्हांदे ,सावन राठोड ,गणेश मालुसरे ,राजेंद्र शेटे ,राजेंद्र कदम यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.