Home ताज्या बातम्या अपंग आई व अंध वडील यांचा 3 वर्षाचा हरवलेल्या मुलास दामिनि मार्शलने सुखरूप दिले त्यांच्या ताब्यात

अपंग आई व अंध वडील यांचा 3 वर्षाचा हरवलेल्या मुलास दामिनि मार्शलने सुखरूप दिले त्यांच्या ताब्यात

0

अपंग आई व अंध वडील यांचा 3 वर्षाचा हरवलेल्या मुलास दामिनि मार्शलने सुखरूप दिले त्यांच्या ताब्यात

शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2019 रोजी दामिनी मार्शल मोरे व काळे ह्या सहकारनगर, भारती विद्यापीठ हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना. कात्रज, संतोष नगर गल्ली नंबर 8 येथे 3 वर्षांचा लहान मुलगा रडत असल्याचे दिसला त्या लहान मुलास जवळ घेऊन विचारपूस केली असता. त्याने त्याचे नाव “योगेश गाडवे” असे सांगितले. सदर घटनेची दामिनी पथकाचे इन्चार्ज महिला पोलिस उपनिरीक्षक टिळेकर यांना फोनद्वारे माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे 3 वर्षाच्या लहान मुलास सोबत घेऊन त्याच्या आई-वडिलांचा संतोषनगर, कात्रज परिसरात शोध घेत असताना. परिसरातील एका महिलेने मुलाच्या आई-वडीलांच्या बाबतीत माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जाऊन लहान मुलांच्या अपंग आई- अंध वडिलांना भेटून त्यांची खात्री करून वरिष्ठांना याबाबतीत सर्व माहिती देत. मुलाच्या आई-वडिलांना कात्रज पोलीस चौकी येथे आणून कात्रज चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिवडशिट्टी व दामिनी पथकाचे महिला पोलीस उपनिरीक्षक टिळेकर यांच्यासमक्ष आई-वडिलांची ओळख पटवून लहान मुलास सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले. अपंग आई-अंध वडिलांनी दामिनी पथकाचे व पुणे पोलिसांचे आभार मानून कौतुक केले.

सदर कामगिरी,
कात्रज पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चिवडशिट्टी, दामिनी पथक व भरोसा सेलचे महिला पोलीस उपनिरीक्षक टिळेकर, दामिनी मार्शल मोरे, काळे यांनी केली.