अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा
धुळे : सोनगीर फाट्यानजिक ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
एमएच १८ एम ९६५३ क्रमांकाचा ट्रक आणि एमएच १४ बीझेड ५१०५ क्रमांकाची दुचाकी यांच्यात मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील सोनगीर फाट्यानजिक अपघात झाला़ अपघाताची ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात संदिप अरविंद पाटील (३६, रा़ वाघाडी बुद्रुक ता़ शिंदखेडा) हा या तरुणाचा मृत्यू ओढवला होता़ अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल अशोक पवार घटनेचा तपास करीत आहेत़
दरम्यान, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे ते रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना झाल्या पाहीजे़