अपघातात दोन दुचाकीस्वार ठार

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २३ मे : ट्रक आणि ट्रॅक्टर दोन्ही मध्ये चेंबल्याने दुचाकी स्वार दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भंडारी येथे गुरुवारी घडली. दोघे दुचाकीस्वार युवक भंडारी येथील रहिवासी होते.

राहुल उमाकांत जाधव आणि राहुल लिंबराज वाळवे हे दोघे तुळजापूर – लातूर रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करत होते. सार्थक हॉटेल समोर ट्रक क्रमांक एम एच २६ एडी १२९८ ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकी समोर असलेल्या ट्रॅक्टरच्या (क्रमांक  एम एच २४ ए एस ०८४४) ला धडकली. यात दोघे दुचाकीस्वार ठार झाले. या प्रकरणी मेघराज काशिनाथ पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली

- Advertisement -