Home गुन्हा अपहरण करून दीड कोटींची खंडणी उकडणारे आरोपींना पुणे पोलिसांनी केले जेरबंद

अपहरण करून दीड कोटींची खंडणी उकडणारे आरोपींना पुणे पोलिसांनी केले जेरबंद

0

पुणे : परवेज शेख १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता तळेनगर सोसायटी समोरील गंगाधाम रोडवरील सरकारी गोडाऊन जवळून अनोळखी तीन इसमांनी कांतिलाल गणात्रा (वय ६५, रा. मार्केटयाड) हे दुकान आवरून घरी जात असताना आपल्या मोटार सायकलवरून जात असताना त्याना चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण करून त्यांचा मुलगा महेश गणात्रा यास वडिलांच्या खुनाची धमकी देऊन २ कोटी रोख रकमेची मागणी केली.

परिमंडळ-५ च्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे
शाखे कडील अधिकारी व पोलिसांच्या वेगवेगळ्या टिम करून आदेशपर मार्गदर्शक सुचना देऊन अपहरणकर्ते व अपहृत इसमांच्या वेगवेगळ्या टिमांवर त्यांचेकडील प्रभारी अधिकारी नेमून सदर बाबत शोध घेण्यात आला होता.

अपहरणकर्त्यांनी सदरची रक्कम चांदनी चौक येथे । आणणेबाबत सांगितल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व स्थानिक पोलिसांच्या
मदतीने अपहरण केलेल्या इसमाचा मुलगा याने दीड कोटी रक्कम घेऊन गेले असताना तिथे सापळा रचण्यात आला होता. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यानुसार प्रथम रक्कम ठेवण्यात आल्यानंतर सदर रक्कम घेण्यासाठी आलेल्या आरोपीना सदर रक्कम घेऊन पसार होत असताना मोटरसायकलस्वाराना पाठलाग करून पकडण्यात आले आहे.

रक्कम इतर साथीदारांनी फॉर्म्युनर गाडीतून घेऊन पसार झाले होते. सदर पकडलेल्या आरोपी सुजित गुजर (वय २४, रा. उरूळी देवाची ता. हवेली, जि. पुणे), ओकार वाल्हेकर (वय २०, रा. उरूळी देवाची ता. हवेली, जि.पुणे) याना पकडून तपास केल्यानंतर त्यांचा मुख्य सुत्रधार रा. अजय साबळे, (रा. मु.पो. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे) त्याचे इतर साथीदार अमित जगताप (रा. मु.पो.उरूळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सदर रक्कम फॉर्म्युनर गाडीतून नेल्याचे कबूल केले आहे.


त्यानुसार गुन्हे शाखेकडील युनिट ५ व पोलिस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी यांनी उरूळी देवाची व वडकी नाला पिंजून काढून अमित ।
जगताप यांनी गुन्ह्यात वापरलेली फॉर्म्युनर कार व खंडणीत स्विकारलेले रोख १,४७,५०,०००/- ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉर्म्युनर कार, वरील रोख रक्कम व इतर चिजवस्त असे एकूण १,७५,२०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस आयुक्त, सहा. पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, पूर्व विभागचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, गुन्हेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, परिमंडळ-५ चे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, गुन्हेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग सुनिल कलगुटकर, व सहायक पोलिस आयुक्त प्रतिबंध विभागचे शिवाजी पवार, प्रॉसिक्युशन विभागचे सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी, मार्केटयार्ड पोलिस स्टेशनातील पोलिस अधिकारी व प्रभारी अधिकारी व तपास पथकातील अधिकारी व कर्मचारीसह गुन्हे शाखेकडील अं.प.वि.प. व खंडणी पश्चिमचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोहिते व अधिकारी व कर्मचारी व अं.प.वि.प. पूर्वचे प्रभारी अधिकारी विजय टिकोळे आणि अधिकारी व कर्मचारी आणि युनिट-५ कडील प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण आणि अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.