अफगाणिस्तानमध्ये भीषण स्फोट, 16 जणांचा मृत्यू

- Advertisement -

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका गाडीत झालेल्या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटाची जवाबदारी तालिबानने घेतली आहे.
सोमवारी अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले 5 हजार सैनिक माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालिबान्यांनी हा स्फोट घडवला. ज्या भागात बहुतांश विदेशी संस्था आणि विदेशी नागरिकांची रेलचेल असते त्या भागातच तालिबान्यांनी स्फोट केला आहे. रहिवासी भागापासून एक किलोमीटर दूर हा स्फोट झाला. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -