हायलाइट्स:
- अभिनेता पर्ल वी पुरीच्या अडचणींमध्ये वाढ
- जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला
- याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार
अनेक टीव्ही कलाकारांनी दिलाय पर्लला पाठिंबा
पर्लवर लावलेल्या या गंभीर आरोपामुळे संपूर्ण टीव्ही विश्वामधील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. पर्लला अटक झाल्यानंतर अनेक टीव्ही कलाकारांनी तो निर्दोष असल्याचे सांगत त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये अनिता हसनंदानी, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना, एकता कपूर, अली गोनी, निया शर्मा यांचा समावेश आहे. या सर्वांनी पर्लच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केले आहे. या प्रकरणातील सत्यता लवकरच बाहेर येईल आणि पर्ल निर्दोष सुटेल असा दावा या सर्वांनी केला आहे.
पर्लला अटक झाल्यानंतर बालाजी टेलिफिल्मची सर्वेसर्वा एकता कपूरने सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने पर्ल हा निर्दोष असल्याचे म्हटले आहे. एकताच्या मते पीडित मुलीच्या पालकांमधील भांडणामध्ये निष्कारण पर्लचा बळी दिला जात आहे. एकताच्या मते त्या मुलीच्या आईने देखील पर्ल निर्दोष असल्याचे मान्य केले आहे. मात्र, पर्लच्या विरोधात पुरावे सापडले असून त्यावरून तो दोषी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने देखील पर्लला पाठिंबा दिला आहे. तिच्या मते पीडित मुलीच्या वडिलांनी पर्लला या प्रकरणात अडकवले आहे असा दावा केला आहे.
पर्ल पुरी हा टिव्ही जगतामधील लोकप्रिय अभिनेता आहे. नागिन ३ या मालिकेतून तो सर्वाधिक लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याने अनेक टिव्ही मालिकांमध्ये काम केले होते. टीव्ही इंडस्ट्रीमधील चॉकलेट हिरोंमध्ये पर्लचा समावेश होते. परंतु आता या प्रकरणात अडकल्यामुळे पर्लच्या करीअरवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. आता याप्रकरणातून नेमके काय सत्य उघडकीस येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.