हायलाइट्स:
- रवीमध्ये झालेल्या बदलला पाहून चाहते झाले अवाक
- केवळ २० दिवसात रवीने मिळवलं फिट शरीर
- आहारात नव्हतं कोणत्याही प्रकारचं सप्लिमेण्ट आणि प्रोटीन शेक
प्रविण तरडेमुळे कळणार बलुचिस्तानातील मराठ्यांची विजयगाथा
रवीने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. रवीने दोन फोटो शेअर केले. त्यातील एक १२ जूनचा आहे तर दुसरा फोटो नुकताच काढलेला आहे. १२ जूनच्या फोटोमध्ये रवीचं पोट बऱ्यापैकी सुटलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रवी फिट दिसत आहे. वजन कमी करण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल सांगताना रवीने लिहिलं, ‘एका महिन्यात कोणत्याही सप्लिमेण्ट आणि प्रोटीन शेक शिवाय हा बदल. मागील महिन्यात १२ जूनला अचानक एक काम आलं ज्यासाठी मला बारीक दिसणं गरजेचं होतं. पण त्यावेळेस मी बारीक नव्हतो. नुकताच करोनातून उठलो होतो आणि पंजाबमध्ये आराम करत होतो. त्यामुळे माझं वजन १० किलोने वाढलं होतं.
वजन कमी करण्याबद्दल सांगत रवीने लिहिलं, ‘माझ्याजवळ फक्त २० दिवस होते. तेव्हा मी सकाळी वजन उचलणं आणि संध्याकाळी १० किमी धावायला सुरुवात केली. सोबत योग्य खाणं. मी माझ्या ट्रेनर्सचे आभार मानतो की त्यांनी कोणत्याही प्रोटीन शेक आणि सप्लिमेण्टशिवाय माझ्यात हा बदल घडवून आणला.’ रवीचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांसोबत अनेक कलाकारही चकित झाले आहेत. रवीच्या अनेक कलाकार मित्रांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.