Home मनोरंजन अभिनेत्यानेच केला अभिनेत्याचा गाडीचा पाठलाग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्यानेच केला अभिनेत्याचा गाडीचा पाठलाग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

0
अभिनेत्यानेच केला अभिनेत्याचा गाडीचा पाठलाग;  सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

हायलाइट्स:

  • मुंबईच्या रस्त्यांवर दहा मिनीटांचा तो थरारक पाठलाग
  • अभिनेत्यानेच केला अभिनेत्याचा गाडीचा पाठलाग
  • सोशल मीडियावर या पाठलागाचा व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबई : टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युझर्सने लाईक आणि कॉमेन्टचा वर्षाव केला आहे.

काय आहे व्हिडीओत

अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे, ‘अखेर पकडला गेला अभय देओल हा हा हा… हे खूपच मजेशीर होते. आम्ही दहा मिनिटे त्यांचा पाठलाग केला आणि अखेर त्यांना पकडलेच… आयुष्यातील आनंद… तुला भेटून खूप छान वाटलं भाई…’

या व्हिडीओमध्ये करणवीर आणि त्याची बायको तीजय सिद्धू दिसत आहेत. हे दोघेजण त्यांच्या गाडीतून जात असतात. तेव्हा बाजूने अभय देओलची गाडी गेला आहे. आपण त्याच्या गाडीचा पाठलाग करणार आहोत असे करणवीर त्याच्या बायकोला सांगतो. त्यानंतर तो ड्रायव्हरला अभयच्या गाडीचा पाठलाग करायला सांगतो.


दहा मिनीटे केला पाठलाग

करणवीरने अभयच्या गाडीचा पाठलाग करायला आपल्या ड्रायव्हरला सांगतो. अभयच्या गाडीचा पाठलाग करते. करणवीर त्याच्या ड्रायव्हरला गाडी फास्ट चालवायला सांगतो… अखेर दहा मिनीटांच्या पाठलागानंतर एका सिग्नलला अभयची गाडी थांबते. तेव्हा करणवीर त्याच्या गाडीतून उतरतो आणि सिग्नलला उभ्या असलेल्या अभयच्या गाडीजवळ जातो. अभयच्या गाडीजवळ जाऊन करणवीर गाडीच्या खिडकीच्या काचेवर नॉक करतो… अभय गाडीची काच खाली घेतो आणि हैराण होऊन करणवीरकडे बघतो…काही सेकंदांनंतर ते दोघे एकमेकांना हॅलो करतात. तेव्हा करणवीर अभयला सांगतो की दहा मिनिटांपासून मी तुझ्या गाडीचा पाठलाग करत आहे… हे ऐकून अभय देखील हैराण होतो आणि हसू लागतो… काही मिनिटांची ही भेट असते.. सिग्नल सुरू व्हायच्या आत करणवीर पुन्हा त्याच्या गाडीत येऊन बसतो…

करणवीरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील रश्मी देसाईने या व्हिडीओवर कॉमेन्ट केली आहे. तिने लिहिले आहे की, ‘तुम्ही दोघेजण खूपच प्रेमळ आहात…’ तर जुही बब्बरने एक कॉमेन्टमध्ये एक इमोजी शेअर केला आहे.


कॅनडामध्ये होता करणवीर

AssignmentImage-636953678-1626269560

करणवीर आणि तीजय काही महिन्यांपासून कॅनडामध्ये वास्तव्यास होते. तिथेच गेल्यावर्षी डिसेंबर त्यांच्या सगळ्यात लहान मुलीचा जन्म झाला होता. या मुलीचे नाव त्यांना जिया वैनेसा स्नो असे ठेवले आहे.



[ad_2]

Source link