निवेथाने लिहिले की, ‘मला याची काहीही कल्पना नाहीए की स्विगी इंडिया आणि त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या हॉटेल्समध्ये नक्की काय नियम बनवण्यात आले आहेत. मला माझ्या जेवणात दोन झुरळं मिळाली. या हॉटेलवर कडक कारवाई झाली पाहिजे. यासोबतच त्यांना दंडही आकारण्यात आला पाहिजे. मूनलाइट रेस्टॉरन्टला आतातच अॅपवरून काढून टाका.’
निवेथाने अजून एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘मेसेजवरून मला कळलं की फक्त माझ्याच जेवणात झुरळ सापडलेलं नाही. तर अनेक लोक आहेत ज्यांनाही असाच अनुभव आला. हॉटेल एवढ्या निष्काळजीपणे कसे वागू शकतं. मी स्विगी इंडियाकडे विनंती करते की त्यांनी या हॉटेलला आपल्या यादीतून काढून टाकावं.’ यानंतर स्विगी इंडियाने अभिनेत्रीला दिलासा देणारी पोस्ट शेअर हॉटेलविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
स्विगीने दिलं उत्तर-
स्विगीने लिहिलं की, ‘निवेथा आम्ही आभारी आहोत की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला. आमची टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. हा मुद्दा हॉटेलपर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल.’ निवेथानं विजय आणि राशी यांच्यासोबत एक सिनेमा केला. तसेच राणा दग्गुबाती आणि प्रियामणीसोबतही विनेथा एका प्रोजेक्टवर काम करणार आहे.

























WhatsApp