हायलाइट्स:
- कामानिमित्त बनारसला गेल्यावर झाली होती करोनाची लागण
- करोनाची लागण झाल्याचं कळताच अभिनेत्री झाली होती इस्पितळात भरती
- सोशल मिडीयावर अनेकांनी अभिलाषाला श्रद्धांजली वाहिली
आईची शप्पथ… हिला हाकलणे आणि मी Twitter वर येणे …सुव्रत जोशीची पोस्ट चर्चेत
अभिलाषा एक उत्तम अभिनेत्री होत्या. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त अभिलाषा वाराणसीला गेल्या होत्या. तिथे अभिलाषा यांना ताप येत असल्याने त्या मुंबईत परतल्या. करोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने त्या इस्पितळात दाखल झाल्या. मागील चार दिवस अभिलाषा आयसीयूमध्ये होत्या. अभिलाषा मृत्युसोबतची झुंज जिंकू शकल्या नाहीत. ४ मे रोजी त्यांनी अखेचा श्वास घेतला. अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. अभिलाषा यांनी ‘बापमाणूस’ मालिकेत पल्लवीच्या आईची भूमिका साकारली होती. आई होतीस तू माझी, असं म्हणत पल्लवीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस …. baapmanus ला आपण भेटलो होतो… आई होतीस माझी. . ” नुसतं enjoy” असं म्हणून काम…
Posted by Pallavi Ajay on Tuesday, May 4, 2021
अभिलाषा ����������������नाही यार ������������������
Posted by Atul Todankar on Tuesday, May 4, 2021
अभिनेता अतुल तोडणकरने देखील अभिलाषा यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे. अभिलाषा यांनी ‘छिछोरे’ चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्या ‘बायको देता का बायको’, ‘मलाल’, ‘प्रवास’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकल्या होत्या. प्रतिभावंत कलाकाराच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे अभिलाषा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ट्विटर बंद केल्यानं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कंगनानं व्यक्त केला संताप; रडणंही थांबेना