हायलाइट्स:
- बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा पुन्हा एकदा प्रेमात
- वर्षभरापूर्वीच झाला होता मिनिषाचा घटस्फोट
- नुकत्याच एका मुलाखतीत मिनिषानं दिली प्रेमाची कबुली
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दल बोलताना मिनिषा म्हणाली होती, ‘कधी कधी दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहू शकत नाहीत आणि कोणाची काही चुक नसेल तर आपण एकमेकांना दोषी ठरवू शकत नाही. काही गोष्टी खासगी असतात आणि कोणच्याही बाबतीत आपण काहीही बोलून त्याच्यासोबत चुकीचं वागू शकत नाही.’
मिनिषा पुढे म्हणाली, ‘लग्न मोडणं म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्याकडे प्रेम करण्याची आणखी एक संधी असते. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून पुढे जाऊ शकता. मी यावर बोलत आहे कारण अशा परिस्थितीत अडकलेल्या लोकांना मदत व्हावी.’ या मुलाखतीत जेव्हा मिनिषाला तिची सपोर्ट सिस्टिम कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली, ‘माझे जवळचे मित्र, माझं कुटूंब हीच माझी सपोर्ट सिस्टिम आहे. मी याबाबतीत खूप नशीबवान आहे.’
मिनिषाला या मुलाखतीत तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही विचारण्यात आलं. ‘तू देखील स्वतःला प्रेम करण्याची दुसरी संधी देत आहेस का?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. ज्याचं उत्तर देताना ती म्हणाली, ‘हो, सध्या मी एक चांगल्या व्यक्तीसोबत आनंदी रिलेशनशिपमध्ये आहे. मी खूप खूश आहे.’ अर्थात मिनिषानं त्या व्यक्तीचं नाव न घेता हा खुलासा केला.
मिनिषाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती मागच्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या ती तिच्या आगामी ओटीटी प्रोजेक्टवर काम करण्यात व्यग्र आहे. याआधी ती ‘बिग बॉस ८’मध्ये दिसली होती. त्यानंतर ती टीव्ही शो ‘तेनालीरामा’मध्ये दिसली होती. याशिवाय २०१८ मध्ये आलेल्या ‘इंटरनेट वाला लव्ह’ या मालिकेतही झळकली होती.